धक्कादायक, हरणा नदीच्या पूरातूनच निघाली अंत्ययात्रा

बातमी शेअर करा

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील हरणा नदीला पूर आला असून या पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा निघाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पूरस्थितीमुळे इथल्या नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत याद्वारे स्पष्ट झाले आहे.

पितापूर गावातील एका मुस्लीम कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले. पण या भागात मुसळधार पाऊस सुरु असल्याने हरणा नदीला पूर आला आहे. अंत्ययात्रा काढण्यासाठी पर्याय नसल्यांने नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी अक्षरशः आपला जीव धोक्यात घालत नदीच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढली. पाण्याच्या बॅरलवर पार्थिव ठेऊन पुराच्या पाण्यातून ही अंत्ययात्रा काढण्यात आली.
नागरिकांना मुलभूत गरजांसाठी वारंवार झगडावे लागत आहे. या नदीवर पूल व्हावा अशी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. स्थानिक नेत्यांनी अनेकदा ग्रामस्थांना आश्वासने दिली मात्र काहीही त्याचे पुढे काही झाले नाही. स्थानिक व्यवहार करण्यासाठी देखील नागरिकांना या नदीतूनच प्रवासा करावा लागतो. त्यातच आता हे अत्यंयात्रेच विदारक दृश्य समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम