अभिनेत्री श्वेता तिवारीच्या बोल्ड लूक आला समोर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I 30 डिसेंबर २०२२ I भोजपुरी सिनेमातून आपल्या करिअरची सुरूवात करणारी अभिनेत्री श्वेता तिवारी आज टीव्हीवरील सगळ्यात फेमस अभिनेत्री आहे. श्वेता तिवारी नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्यांनी कारणांनी चर्चेत असते.

ती तिच्या बोल्ड फोटोंमुळेही लाइमलाईटमध्ये असते. सध्या तिचं असंच एक फोटोशूट गाजत आहे. ज्यात ती थाय स्लिट गाउनमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो पाहून फॅन्स अवाक् झाले आहेत.


श्वेता तिवारी आपल्या अदांनी बॉलिवूडमधील अनेक हिरोईन्सना टक्कर देते. भोजपुरी सिनेमात अनेक सिनेमे केल्यावर श्वेता तिवारी टीव्ही संस्कारी सून बनली होती.
श्वेताने तिचं हे नवं फोटोशूट इन्स्टावर शेअर केलं आहे. ज्यात तिचा ग्लॅमरस, बोल्ड आणि सेक्सी लूक बघायला मिळत आहे. श्वेताचे हे फोटो तिचे फॅन्स पुन्हा पुन्हा बघत आहेत. कारण तिच्या सौंदर्यावरून त्यांची नजरच हटत नाहीये.

42 वय असूनही श्वेता तिवारी 22 वर्षांच्या तरूणींना मात देत आहे. यात वयातही ती इतकी सुंदर आणि फीट दिसते की, त्यावर फॅन्सचा विश्वास बसत नाही.

श्वेता तिवारी नेहमीच तिच्या व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून फॅन्सचं लक्ष वेधून घेत असते. सध्या तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.

श्वेताचे हे फोटो तिच्या फॅन्सच्या हृदयाची धडधड वाढवत आहे. अनेक फॅन्स या फोटोंवर तिचं भरभरून कौतुक करत आहेत. अनेकांनी म्हटलं की, आताच्या बॉलिवूडच्या अनेक हिरोईन तुझ्यासमोर फेल आहेत.

श्वेता तिवारी तिची मुलगी पलक तिवारीसोबतही तिचे फोटो शेअर करत असते. पलक सध्या बॉलिवूडमध्ये जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकजण तर हेही म्हणतात की, पलकपेक्षा तिची आई श्वेता हीच हॉट आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम