भोद येथे सर्पदंश झाल्याने वृध्दाचा मृत्यू

भोद येथे सर्पदंश झाल्याने वृध्दाचा मृत्यू

बातमी शेअर करा

भोद येथे सर्पदंश झाल्याने वृध्दाचा मृत्यू

धरणगाव: सद्या निसर्गाचा हवा उन-पाऊसाचा खेळ सुरु आहे. तसेच वातावरणात उकाड्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अश्या वातावरणात शेतशिवारात सर्पांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळून येतो. अनेकदा सर्पदंश होऊन मृत्यू होण्याच्या घटना घडतात. नुकतीच धरणगाव तालुक्यातील भोद बु. येथील ६५ वर्षीय वृध्द व्यक्तीचा सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक असे की, अशोक पुंडलिक पाटील रा. भोद बु. ता.धरणगाव जि. जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. अशोक पाटील हे दि.२८ मे रोजी शेतात काम करत असतांना त्यांना उजव्या पायाला सर्पाने चावा घेतला. त्यांना तातडीने धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता अशोक पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी आज रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील करीत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम