मुस्लिम युवकांचा प्रामाणिक पणा;सापडलेला मोबाईल मालकाला केला परत

मुस्लिम युवकांचा प्रामाणिक पणा;सापडलेला मोबाईल मालकाला केला परत

बातमी शेअर करा

मुस्लिम युवकांचा प्रामाणिक पणा;सापडलेला मोबाईल मालकाला केला परत

धरणगाव रेल्वे स्थानकावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या तरुणाला नळाजवळ एमआयचा मोबाईल आढळून आला होता.याबाबत तरुणाने धरणगाव पोलिसांना माहिती दिल्याने मोबाईल मालकाच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,दि .31 मे मंगळवार रोजी करीम खान आणि नदीम काजी हे त्यांच्या मित्राला धरणगाव रेल्वे स्थानकावर नेण्यासाठी गेले होते.तेव्हा रेल्वे स्थानकावर पाण्याच्या नळाजवळ एमआय कंपनीचा मोबाईल आढळून आला.त्यानंतर करीम खान आणि नदीम काजी यांनी त्या मोबाइल बाबत धरणगाव पोलीस स्टेशन येथील गोपनीय विभागाचे वैभव बाविस्कर यांच्याशी संपर्क साधून मोबाइल मालक काशीनाथ पाटिलचा मुलगा शुभम पाटिल यांना फोन करून या मोबाईलची माहिती दिली .1 जून बुधवारी रोजी धरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआई जीभाऊ पाटिल यांच्या समक्ष काशीनाथ पाटिल यांच्या नातेवाईक बाबा जाधव रा. पसष्टाने ता.धरणगाव यांचे कड़े देण्यात आले.करीम व नदिमने प्रामाणिक पणें मोबाईल परत केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम