प्रकल्प अधिकाऱ्यांकडून धरणगावातील आदिवासी भागाची पाहणी; पुरोगामी संघर्ष परिषदचे विशेष प्रयत्न

प्रकल्प अधिकाऱ्यांकडून धरणगावातील आदिवासी भागाची पाहणी; पुरोगामी संघर्ष परिषदचे विशेष प्रयत्न

बातमी शेअर करा

प्रकल्प अधिकाऱ्यांकडून धरणगावातील आदिवासी भागाची पाहणी; पुरोगामी संघर्ष परिषदचे विशेष प्रयत्न

धरणगाव येथील पुरोगामी संघर्ष परिषदेच्या प्रयत्नातून यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी नुकतीच धरणगावातील आदिवासी भागात पाहणी करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. याबत अधिक असे, शहर व परिसरात पारधी, भिल्ल व पावरा आदिवासी समाज बहुसंख्येने असून त्यांच्याकडे ७/१२ व ८ अ उतारा नसून ते अतिक्रमित भागात वस्ती करून राहतात. त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, त्याचप्रमाणे शबरी घरकुल योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना, आदिवासी समाजासाठी २००३/०४ पासून घरकूल योजना सुरू झाली आहे. यासोबत आर्थिक व सामाजिक विकास अश्या अनेक विषयावर यावल येथील आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे मॅडम यांच्याशी पुरोगामी संघर्ष परिषदेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष जितेंद्र चव्हाण व पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. तसेच आदिवासी समाजाच्या समस्याबाबत आपण पाठपुरावा करावा. आदिवासी वस्ती भेट प्रसंगी विनिता सोनवणे मॅडम यांनी आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. सदर समस्यांचे निराकरण होण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम