घर घर वृक्षारोपणाचा संकल्प गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ०६ ऑगस्ट २०२२ ।  स्वातंत्र्याच्या ७५व्या अमृतमहोत्सव वर्षानिमित्त ‘घर घर तिरंगा’ या मोहिमेसोबतच ‘घर घर वृक्षारोपण’ करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प जळगाव येथे शिवकाॕलनी परिसरातील सप्तश्रृंगी चौकातील रहिवाश्यांनी केला.

गांधी रिसर्च फाऊंडेशन  (Gandhi Research Foundation) आणि मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जैन इरिगेशन सिस्टीम लि.च्या (Jain Irrigation System Ltd.) सहकार्याने हरित जळगाव हा सृजनशिल उपक्रम सुरू आहे. आज दि. ०६ ऑगस्ट २०२२ रोजी शिवकाॕलनीतील कोल्हेनगर (पश्चिम) येथील सप्तश्रृंगी चौकालगत असलेल्या गट नं. ५९ च्या हनुमान मंदीर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असून सदर प्रसंगी जैन इरिगेशनचे अनिल जोशी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, अरूण नारायण आसोदेकर, विनय पवार, महेश पाटील,किरण आसोदेकर, पारोळा वनअधिकारी बी. एस. पाटील, मुकंद वाणी, चंद्रकांत बाविस्कर, अमोल चौधरी यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

उपस्थितांनी निंब, करंज, बकूळ, कांचन, बुच, चांदणी, कन्हेर, जास्वंद, बेल, पारिजातक, पळस, अमलतास अशा १०० च्यावर रोपांची लागवड करण्यात आली. रहिवाश्यांनी वृक्षसंर्वधनाची प्रतिज्ञा घेत प्रत्येक घरासमोर एक झाड जगविण्याचा संकल्प केला. ॲड. जमिल देशपांडे यांनी फाऊंडेशन व प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागातील सहकारी मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, मयूर देशमुख, किशोर ताळे, प्रतिक फुसे, दिलीप मते, निलेश मिस्तरी यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम