Gandhi Research Foundation | गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनी ‘भारत से जुडो’ विषयावर व्याख्यान

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ०८ ऑगस्ट २०२२ । गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे (Gandhi Research Foundation) दि. ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी “भारत से जुडो” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे (Kavayitri bahiṇabai uttara maharaṣṭra vidyapiṭha) कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी मुख्य भाषण करतील त्यांच्यासोबत ज्येष्ठ गांधीजन व सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर संवाद साधणार असून कार्यक्रमास गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष व अशोक जैन व डीन प्रा. गीता धर्मपाल (Director of Gandhi Research Foundation and Chairman of Jain Udyog Group and Ashok Jain and Dean Prof. Geeta Dharmapala) उपस्थित राहणार आहेत.

महात्मा गांधींनी इंग्रजांना “भारत छोडो… चले जाव”चा नारा ९ ऑगस्ट १९४२ रोजी दिला होता. आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना “भारत से जुडो”ची आवश्यकता आहे. जैन हिल्सच्या (Jain Hills) गांधीतीर्थमधील कस्तुरबा सभागृहात दुपारी ३ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

गांधी तीर्थच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनेलवरही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम