स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जैन इरिगेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे विद्युत रोषणाई

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ०८ ऑगस्ट २०२२ । जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. (Jain Irrigation Systems Ltd.) व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन (Bhawarlal and Kantabai Jain Foundation) तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जळगाव शहरात विद्युत रोषणाई करण्यात येणार असून ९ आॕगस्ट म्हणजे ‘क्रांती’ दिनापासून ते १७ आॕगस्ट २०२२ पर्यंत आकर्षक रंगसंगती असणारी विद्युत रोषणाई केली जाईल. यात जळगाव शहरातील राष्ट्रीय महापुरूषांच्या १९ पुतळ्यांसह, महात्मा गांधी उद्यान (Mahatma Gandhi Park), भाऊंचे उद्यान व लालबहादूर शास्त्री टाॕवर (Bhaunche udyan va lalabahadura sastri ṭavar), स्वातंत्र्य चौक (swatantra chouk), काव्यरत्नावली चौक (kavyaratnawali chouk) यांचा समावेश आहे.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे शहरातील चौकांवर विशेष सजावटींसह प्रबोधनात्मक संदेश दिले जातात. यात सण-उत्सवांसह राष्ट्रीय एकात्मेची जाणिव निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. याच धर्तीवर काव्यरत्नावली चौकात विशेष सजावट व विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सोबतच स्वातंत्र्य चौक, लालबहादूर शास्त्री टाॕवर याठिकाणीही विद्युत रोषणाईतुन राष्ट्रभक्तीचा जागर केला येईल.

जळगाव शहरातील १९ सार्वजनिक स्थळी असलेल्या राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई करण्यात येईल. यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाराणा प्रताप पुतळा, महात्मा गांधी पुतळा, पंडीत जवाहरलाल नेहरू पुतळा, डाॕ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लाल बहादूर शास्त्री पुतळा, नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा, स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर पुतळा, शाहिर अण्णाभाऊ साठे पुतळा, सानेगुरूजी पुतळा, स्व.जेठमल स्वारस्वत स्तंभ, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, संत गाडगे बाबा पुतळा, धनाजी नाना पुतळा, महर्षी वाल्मीक पुतळा, कवयित्री बहिणाबाई पुतळा, संत जगनाडे महाराज पुतळा, नवल स्वामी महाराज पुतळा या पुतळ्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई केली जाईल

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम