धरणगाव नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर

धरणगाव नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर

बातमी शेअर करा

धरणगाव नगरपरिषदेच्या नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर

२३ पैकी १ एससी तर १ जागा एसटी साठी

धरणगाव: धरणगाव नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या २०२२ करिता निवडणूकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले. यात सर्व ११ प्रभागाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे . जळगाव जिल्हा अधिकारी यांच्याकडील आदेशानुसार धरणगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठी आरक्षणाच्या अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती मधील महिला व सर्वसाधारण प्रवर्गातील महिला यांचे प्रभाग निहाय आरक्षण सोडत काढण्यासाठी एरंडोल उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांची नेमणूक करण्यात आली होती . त्यानुसार आज दि.१३ जून २०२२ रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पालिकेच्या प्रांगणात सभा झाली. यानुसार पालिकेच्या एकूण प्रभागात अनुसूचित जातीसाठी १ तर सर्वसाधारण महिला ११ तर अनुसूचित जमातीसाठी एक जागा आरक्षित आहे . प्र. क्र. आणि निश्चित करण्यात आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे १. अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण ( खुला ) २. अ अनुसूचित जाती ब सर्वसाधारण महिला ३. अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण ( खुला ) ४. अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण ( खुला ) ५. अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण ( खुला ) ६. अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण ( खुला ) ७. अ अनुसूचित जमाती – ( महिला ) ब सर्वसाधारण ( खुला ) ८. अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण ( खुला ) ९ . अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण ( खुला ) १०. अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण ( खुला ) ११. अ सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण महिला क सर्वसाधारण ( खुला ) असे असणार आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम