सुवर्ण महोत्सवी शाळेत”शाळा प्रवेशोत्सव”साजरा
सुवर्ण महोत्सवी शाळेत"शाळा प्रवेशोत्सव"साजरा
सुवर्ण महोत्सवी शाळेत”शाळा प्रवेशोत्सव”साजरा
पहिल्याच दिवशी मुख्याध्यापकांच्या हस्ते पुष्पगुच्छ -पुस्तक वाटप
धरणगांव -धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेत पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व आलेल्या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक व शिक्षक बंधू-भगिनी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार,पर्यवेक्षक एम. बी.मोरे व ग्रंथपाल गोपाल महाजन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात गोड पदार्थ देऊन पहिला दिवस गोड करण्यात आला.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वृंद उपस्थित होते
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम