धरणगाव येथील वाहतूक नियंत्रक मुकुंद पाटील यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

धरणगाव येथील वाहतूक नियंत्रक मुकुंद पाटील यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

बातमी शेअर करा

धरणगाव येथील वाहतूक नियंत्रक मुकुंद पाटील यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

धरणगाव : धरणगाव आगाराचे वाहतूक नियंत्रक मुकुंद बळीराम पाटील हे आज सेवानिवृत्त झाल्याने त्यांचा सामाजिक संघटनेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.श्री.पाटील यांनी राज्य परीवहन महामंडळात अविरतपणे ३३ वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावली. या सत्कार प्रसंगी पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की,गेल्या ३३ वर्षापासुन एसटी महामंडळात सेवा करताना अधिकारी,सहकारी कर्मचारी वर्ग,कुटुंबीय,मित्रपरिवार या सर्वांनी साथ दिली.

प्रवाशांना चांगली सेवा देता आली,यातच आपले मोठे समाधान आहे.त्याचबरोबर समाजासाठी काम करताना सर्वांचे सहकार्य मिळाले. एसटी महामंडळातून जरी सेवानिवृत्त होत असलो तरी,यापुढील काळात समाज आणि समाजकार्यासाठी नेहमीच कार्यरत राहणार आहे.आज रोजी धरणगावकरांनी केलेला सन्मान,व तुम्हा सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा निश्चितच प्रेरणादायी ठरतील,असेही यावेळी म्हणाले. एसटी महामंडळात वाहतूक नियंत्रक श्री.पाटील यांनी उत्कृष्ट अशी सेवा केली.वाहतूक नियंत्रक पदावर केलेले कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.सामाजिक आणि समाज कार्यातही त्यांचे काम आदर्शवत असेच आहे.त्यांचे मार्गदर्शन सर्वाना प्रेरणादायी ठरेल.त्यांनी यापुढील काळात समाजकार्यात असेच कार्यरत राहावे,अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करीत,त्यांना सेवानिवृत्तीपर पुढील वाटचालीसाठी मंगलमय सदिच्छा दिल्या. यावेळी काशिनाथ महाजन वीरेंद्र सूर्यवंशी वाहतूक निरीक्षक दशरथ महाजन जितेंद्र सोनवणी, चंद्रशेखर कोठारी,पोस्टमन गोपाल परदेशी,अशोक पाटील,इरफान बागवान,संजय बन्सी, नफीस शेख,अनिल महाजन यासह पत्रकार राजेंद्र वाघ, बाळासाहेब जाधव,निलेश पवार आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम