मो.पैगंबरांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी मुस्लिम बांधव आक्रमक

मो.पैगंबरांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी मुस्लिम बांधव आक्रमक

बातमी शेअर करा

मो.पैगंबरांचा अवमान करणाऱ्या भाजपच्या नुपूर शर्माच्या अटकेसाठी मुस्लिम बांधव आक्रमक

धरणगावात जोरदार निदर्शने, तहसिल व पोलिसात निवेदन

धरणगाव : भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी भाजप च्या प्रवक्त्या नुपूर शर्माच्या निषेधार्थ धरणगाव तालुका राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे पदाधिकारी नगर मोमीन व शहर परिसरातील मुस्लिम कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

यावेळी खालिक अहिलेकार, हाजी इब्राहीम, राजु शेख, नईम काझी, करीम लाला, हसन मोमीन यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ जोरदार निदर्शने करण्यात आले. तत्पूर्वी धरणी परिसरात क्रांतीसुर्य राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, तद्नंतर कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक,छत्रपती शिवाजी महाराज व संविधान निर्माते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास माल्यार्पण करण्यात आले.

तद्नंतर तहसिलदार मा. नितीनकुमार देवरे व पोलिस निरीक्षक मा.राहुल खताळ यांना निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे अध्यक्ष नगर मोमीन यांनी निवेदन सादर प्रसंगी सांगितले की, मो. पैगंबर आणि प्रेषीतांचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करणेसाठी महाराष्ट्र सरकारने विशेष कायदा करावा. नूपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य टीव्ही वाहिनीवरील चर्चेत केलं होतं. त्याचबरोबर आज सामान्य भारतीयांना पोट भरण्याची चिंता आहे.महागाई गगनाला भिडली आहे. उच्च शिक्षित पदवीधर तरुण बेरोजगार आहेत. खाजगीकरणचा घाट घातला जात आहे.

ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, शेतकऱ्यांबद्दलचे धोरण असे कितीतरी प्रश्नावर बोलले पाहिजे. भारताची अर्थव्यवस्था धोक्यात आली असून भारताची वाटचाल श्रीलंकेच्या दिशेने सुरू आहे. या सर्वांवरून लक्ष हटविण्यासाठी धर्माचे कार्ड वापरले जात आहे. मंदिर, मस्जिद असे वाद निर्माण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण, भारतीय जनता सुजाण आहे. आपला भारत देश हा संत महापुरुषांच्या सर्वसमावेशक विचारांवर आधारित असून संविधानावर चालणारा आहे. म्हणून नुपूर शर्मा यांनी कायदा सुव्यवस्थेचे भान न राखता जे समाजविघातक विधान केले आहे ते विधान जाणीवपूर्वक आणि नीतीधोरणानुसारच केले आहे. याकरीता धरणगाव शहर मुस्लिम बांधव नूपुर शर्माचा निषेध करण्यासाठी निवेदन देण्यात येत आहे. नुपूर शर्मा यांच्यावर केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही. त्यांना तत्काळ अटक करण्यात आली पाहिजे. तसेच, कोणत्याही धर्माच्या प्रेषित आणि महामानवांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी नवीन कायदा करण्यात यावा, अशी मागणी यावेळी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे अध्यक्ष नगर मोमीन यांनी निवेदन सादर प्रसंगी मनोगतातून सांगितले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम