सुवर्ण महोत्सवी शाळेत स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

सुवर्ण महोत्सवी शाळेत स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

बातमी शेअर करा

सुवर्ण महोत्सवी शाळेत स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन

चित्रकला, रंगभरण, रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न

शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.यामध्ये चित्रकला स्पर्धा,रंगभरण स्पर्धा, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार व चित्रकला शिक्षक एच.डी. माळी यांच्या व शासनाच्या परिपत्रकानुसार दिलेल्या विषयांवर चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा व रंगभरण स्पर्धेत मोठ्या उत्साहाने घेण्यात आली.या तिन्ही स्पर्धांमध्ये शाळेतील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.या सर्व स्पर्धांमध्ये प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले.

रांगोळी स्पर्धाचे परीक्षणासाठी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका पी.आर.सोनवणे,एम.के.कापडणे,श्रीमती व्ही.पी.वऱ्हाडे,श्रीमती एम.जे.महाजन यांनी केले तर चित्रकला स्पर्धेचे परीक्षण एच.डी.माळी,एम.बी.मोरे,पी.डी.पाटील,सी.एम.भोळे यांनी केले. तसेच रंग भरण स्पर्धेचे परीक्षण एच.डी.माळी,एस.एन.कोळी, एस.व्ही.आढावे,व्ही.टी.माळी यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम