सुवर्ण महोत्सवी शाळेत स्वातंत्र्याचा ७५ वा “आझादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत जनजागृती रॅली

सुवर्ण महोत्सवी शाळेत स्वातंत्र्याचा ७५ वा "आझादी का अमृत महोत्सव " अंतर्गत जनजागृती रॅली

बातमी शेअर करा

सुवर्ण महोत्सवी शाळेत स्वातंत्र्याचा ७५ वा “आझादी का अमृत महोत्सव ” अंतर्गत जनजागृती रॅली

धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेने स्वातंत्र्याचा ७५ वा “आझादी अमृत महोत्सव ” अंतर्गत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, क्रीडाशिक्षक एच.डी.माळी यांच्या मार्गदर्शनाने जनजागृती ला सुरुवात करण्यात आली. रामदेवजी बाबा नगर, नेहरूनगर, नगर परिषद धरणगांव मार्गाने सावित्रीबाई फुले उड्डाणपूला जवळुन छत्रपती शिवराय स्मारक तेथून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परत शाळेत अशा मार्गाने रॅली काढण्यात आली.शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध घोषणाच्या माध्यमातून घरो-घरी तिरंगा, माझी शाळा माझी शान – तिरंगा अमुचा अभिमान, आमचा राष्ट्रध्वज – आमचा आत्मसन्मान, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो.अशा विविध घोषणांनी परिसरात जनजागृती करण्यात आली.या जनजागृती रॅलीला शाळेतील शिक्षक बंधू – भगिनी,कर्मचारी वृंद व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम