श्रुती हसनच्या वक्तव्याने आली चर्चेत

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २९ डिसेंबर २०२२ I अभिनेत्री श्रृती हसन सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.आता श्रृती हसनने बॉलिवूडबाबात मोठं वक्तव्य केलं आहे.श्रृतीनं एका मुलाखतीत सांगितलं, मी कोणाच्या भावना दुखावल्या नाहीत, कोणाचं काम हिसकावलं नाही तरी बॉलिवूडमध्ये लोकांनी मला स्विकारलं नाही.

 

मी जेव्हा इंडस्ट्रीत आले तेव्हा लोक माझ्याबद्दल फार चांगल्या गोष्टी बोलले नाहीत, पण आज बोलतात त्यासाठी आभारी आहे.यावेळी श्रृतीनं तिच्या करिअरच्या सुरुवातीचा कठिण असल्याचं सांगितलं.सुरुवातीला लोकांनी तिला कपडे घालण्यापासून कसं बोलायचं याविषयीही सांगितलं,

 

असंही श्रृती म्हणाली.श्रृती पुढे म्हणाली, मी खऱ्या आयुष्यात जशी आहे तशीच सोशल मीडियावरही आहे. मला ढोंगीपणा करायला आवडत नाही.श्रृती सध्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये व्यस्थ आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम