बिसलेरी कंपनी टाटा समूह विकत घेणार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | २५ नोव्हेंबर २०२२ | थम्स अप, गोल्ड स्पॉट आणि लिम्का हे सॉफ्ट ड्रिंक ब्रॅण्ड कोका-कोलाला विकल्यानंतर तब्बल तीन दशकांनंतर रमेश चौहान हे बिसलेरी इंटरनॅशनल कंपनी आता टाटा कझ्युमर प्रॉडक्ट लिमिटेडला (टीसीपीएल) विकण्याच्या तयारीत आहेत.

बिसलेरीचा आपल्या ताफ्यात समावेश करण्यासाठी टाटादेखील पाण्यासारखा पैसा खर्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल 6 ते 7 हजार कोटी रुपयांना ही डील होणार आहे.

बिसलेरी ही बाटली बंद पाण्याच्या व्यवसायातील देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. 82 वर्षीय चौहान यांचे म्हणणे आहे की, भविष्यात बिसलेरीचा विस्तार करण्यासाठी त्यांच्याकडे योग्य उत्तराधिकारी नाही. चौहान यांची मुलगी जयंती हिलादेखील व्यवसायात रस नाही. त्यामुळे टाटा ग्रुप आपल्या कंपनीची योग्यरीत्या देखभाल आणि विस्तार करेल, असा विश्वास चौहान यांना आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम