चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | २५ नोव्हेंबर २०२२ | चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. चीनमधील झेंग्झौ शहरात जगातील सर्वात मोठा आयफोन कारखाना आहे, म्हणून झेंग्झौला आयफोन सिटी देखील म्हटले जाते.

या शहरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. फॉक्सकॉन कारखान्यात बुधवारी हिंसक निदर्शने झाली. यावेळी पोलिस आणि हजारो कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. वेतन न मिळाल्याने कर्मचारी आक्रमक झाले होते. यानंतर प्रशासनाने या शहरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये झेंग्झौ शहरासह अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. चीनी प्रशासनाने पुन्हा एकदा शून्य कोविड धोरण स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. बुधवारी, चीनमध्ये 31,454 नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी 27,517 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम