मद्याच्या आहारी जाऊन मृत्यूच्या दारातून परतली हि अभिनेत्री ?

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २६ डिसेंबर २०२२ I बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. पूजानं 90 च्या शतकात तिच्या ग्लॅमरस अंदाजानं खळबळ उडवली होती.

पूजाचं लग्न झालं होतं, याची माहिती खूप कमी लोकांना आहे. मात्र, पूजाचं वैवाहिक आयुष्य हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत होतं. पूजानं पूर्वाश्रमीचा पती मनीष माखिजापासून घटस्फोट घेतल्यानंतर तिच्या आयुष्यात खूप मोठे परिणाम झाले. इतकंच काय तर त्यानंतर पूजाला मद्यपानाचे व्यसन लागले आणि त्यानं तिच्या आयुष्यावर गंभीर परिणाम झाला होता.

अमर उजालानं दिलेल्या वृत्तानुसार पूजा भट्टला मद्यपानाचे व्यसन होते. पूजानं 2003 मध्ये वीजे मनीष मखीजासोबत लग्न केलं होतं. 11 वर्षे संसार केल्यानंतर त्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी लगेच घटस्फोट घेतला. पूजाला असलेले मद्यपानाचे व्यसन आणि त्यांच्यात वाढत असलेली भांडण पाहता त्यांनी 2014 साली घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या 2 वर्षांनंतर देखील पूजानं मद्यपान करण्याचं बंद केलं नाही. घटस्फोटानंतर तर पूजा चक्क इतकं मद्यपान करू लागली की पूजा चक्क मृत्यूच्या दारात होती. एका मुलाखती दरम्यान, पूजानं हा मोठा खुलासा केला होता. वडील महेश भट्ट यांना होती मुलीच्या व्यसनाची चिंताडॉक्टरांच्या इशाऱ्यांनंतर पूजानं 2016 पासून दारू पिणं बंद केलं होतं.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम