ख्रिस्मसनिमित्त राहाचा फोटो व्हायरल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २६ डिसेंबर २०२२ Iराहाच्या जन्मानंतर आलिया आणि रणबीरवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला, तो आजतागायत सुरुच आहे. या साऱ्यामध्येच आनंदाच्या दिवसांची सुरुवात झाली आणि ख्रिसमस येऊन ठेपला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी कपूर कुटुंबीयांच्या ख्रिसमस सेलिब्रेशनची चाहत्यांना उत्सुकला लागून राहिली होती. लग्नानंतर आलियाचं हे सेलिब्रेशन आणखी खास होतं, कारण यावेळी तिच्या लेकीचीही साथ लाभली होती. सगळीकडेच राहाची चर्चा सुरु असताना आलिया यावेळी तरी तिच्या लेकीची पहिली झलक चाहत्यांना दाखवणार का? याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली. अखेर ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण आलाच.


आलिया भट्टनं तिच्या घरात सुरु असणाऱ्या ख्रिसमस सेलिब्रेशनचे काही फोटो चाहत्यांच्या भेटीला आणले. यामध्ये तिचा उत्साह आणि आनंद पाहण्याजोगा होता. या सर्व फोटोंच्या गर्दीत एका गोष्टीनं सर्वांच्याच नजरा वळवल्या. ती म्हणजे, राहाची पहिली झलक. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये राहाचं नाव अगदी स्पष्ट दिसलं आणि नेटकऱ्यांनी यातही समाधान मानलं. रणबीर- आलियाच्या घरात एका ख्रिसमस ट्रीवर राहाच्या नावाचा फुगा लावण्यात आला होता.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम