राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेची स्थापना

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ९ एप्रिल २०२२ । राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात येऊन या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजकुमार व्यास शेगाव, यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी दापोली जिल्हा रत्नागिरी येथील वैभव बहुतुले यांची तर राष्ट्रीय संघटन मंत्री पदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ओमकार माळगावकर यांची निवड करण्यात आली.रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान विविध प्रकारच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यासमस्या सोडविण्या बाबत आवाज उठविण्यासाठी राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी नुकतीच एक बैठक शेगाव येथील शासकीय विश्राम भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये रेल्वेने प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी एक राष्ट्रीय स्तरावर सशक्त अशी रेल्वे प्रवासी संघटना स्थापन करणे गरजेचे असल्याचे मत वैभव बहुतुले यांनी व्यक्त केले होते. त्यानुसार एकमताने राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली.

या संघटनेच्या अध्यक्षपदी शेगाव येथील ज्येष्ठ पत्रकार राजकुमार व्यास यांची तर सरचिटणीस पदी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव बहुतुले यांची तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील बांदेवाडी येथील ओमकार माळगावकर यांची संघटनेच्या राष्ट्रीय संघटन मंत्री पदावर एकमताने निवड करण्यात आली.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम