सकल भारतीयांसाठी डॉ.आंबेडकर प्रेरणास्रोत आहे;मनोहर पवार

सकल भारतीयांसाठी डॉ.आंबेडकर प्रेरणास्रोत आहे;मनोहर पवार

बातमी शेअर करा

सकल भारतीयांसाठी डॉ. आंबेडकर प्रेरणास्रोत आहे ; मनोहर पवार

पिंपळे बु. शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिनी अभिवादन

पिंपळे : धरणगाव तालुक्यातील पिंपळे बु. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविकात कैलास पवार यांनी राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा भारत घडविण्यासाठी अनमोल वाटा आहे. त्याचप्रमाणे ते महान कर्ते समाजसुधारक व विविध विषयांचे अभ्यासक होते. म्हणून आजच्या दिनी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले योगदान व कर्तुत्वाचे स्मरण करून अभिवादन केले जाते. तत्पूर्वी केंद्रप्रमुख मनोहर पवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सकल समाजासाठी प्रेरणास्त्रोत असून आपण सर्वांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालण्याचा निश्चितच प्रयत्न करावा असे मनोगत केंद्रप्रमूख मनोहर पवार यांनी व्यक्त केले. तद्नंतर शाळेचे शिक्षक दत्तात्रय पाटील यांनी महामानव डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्षकार्य व संबंध भारतीय समाजासाठी शेवटच्या क्षणापर्यंतचे कार्य केल्याचे मनोगतातून विद्यार्थी व उपस्थितांना सांगितले. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, व शाळेचे शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार गणेश महाजन यांनी केले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम