अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल मलायकाचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १० डिसेंबर २०२२ I बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चर्चेमध्ये आहे. मलायका तिचा नवीन शो ‘मुव्हींग इन विथ मलायका’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे.

त्याच्या पहिल्या भागामध्ये मलायका तिच्या खाजगी आयुष्य विषयी बोलली आहे. या शोसाठी तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर आणि मुलगा अरहान यांनी कशाप्रकारे तिला प्रोत्साहन दिले, याबद्दल तिने माहिती सांगितली आहे. त्याचबरोबर या शोमध्ये तिने तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

मलायकाने तिच्या नुकत्याच सुरू झालेल्या ‘मुव्हींग इन विथ मलायका’ या शोमध्ये तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. फराह खानने या शोच्या पहिला एपिसोडमध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावली होती. यावेळी फराहने मलायकाला प्रश्न विचारला होता की,’तुझ्या आणि अर्जुनच्या नातेसंबंधाबद्दल बोलल्या जाणाऱ्या गोष्टींना तू कशा प्रकारे तोंड देते?’

या प्रश्नाचे उत्तर देत मलायका म्हणाली की,’माझ्यासाठी कधीच सोपं नव्हतं. मला माझ्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल रोज काहीतरी नवीन ऐकावं लागतं. त्याच्यापेक्षा वयाने मोठी असल्यामुळे मला त्याबद्दल अनेकदा ऐकाव लागतं. जेव्हा एखादा पुरुष स्वतःपेक्षा लहान मुलीला डेट करतो तेव्हा त्याचे कौतुक केले जाते. त्याचबरोबर त्याला राजासारखी वागणूक दिली जाते. मात्र, जेव्हा एक स्त्री वयाने लहान असलेल्या मुलाला डेट करते तेव्हा त्याला ‘आई आणि मुलाची जोडी’ असे म्हणून त्याची चेष्टा केली जाते. या सगळ्यांमध्ये मला सगळ्यात जास्त या गोष्टीचे वाईट वाटते की बाहेरच्या लोकांनी तर माझ्यावर टीका केलीच, पण त्याचबरोबर माझ्या जवळच्या लोकांनी मला ऐकवलं आहे.’ या संभाषणादरम्यान, फराह खानने तिच्या लग्नाचा देखील उल्लेख केला होता.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम