‘लाईफ इन मेट्रो’च्या सिक्वेलमध्ये सारा अली खान दिसणार

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १० डिसेंबर २०२२ I अनुराग बासूचा लाईफ इन मेट्रो (Life In Metro) हा सिनेमा 2007 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये शिल्पा शेट्टी, के के मेनन, आणि शर्मन जोशी हे कलाकार दिसले होते.

या चित्रपटाला चाहत्यांकडून उत्तम पसंती मिळाली होती. या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची आतुरता लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये ‘लाइफ इन मेट्रो’ चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) सोबत अभिनेता आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आदित्य आणि सारा ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

‘लाइफ इन मेट्रो’ या चित्रपटाचे अनेक चाहते आहे. चाहते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची कधीपासून प्रतीक्षा करत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम