राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चातर्फे ‘भारत बंद’ची हाक

राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चातर्फे 'भारत बंद'ची हाक

बातमी शेअर करा

राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चातर्फे ‘भारत बंद’ची हाक

धरणगाव प्रतिनिधी:निलेश पवार

धरणगाव राष्ट्रीय मागास प्रवर्ग (ओबीसी) मोर्चाने दि.२५मे,२०२२ बुधवार रोजी’भारत बंद’चे आयोजन केले आहे.केंद्र सरकारने इतर मागासवर्गीयांची ( ओबीसी ) जातीनिहाय जनगणना करावी,बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या,खासगी क्षेत्रात एससी, एसटी,ओबीसींना आरक्षण लागू करावे,शेतकऱ्यांसाठी एमएसपी कायदा करावा,जुनी पेन्शन योजना लागू करावी,मध्यप्रदेश,ओरिसा आणि झारखंडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ असावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करणार आहे.या आंदोलनाला राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे, अशी माहिती राष्ट्रीय मागास प्रवर्ग ( ओबीसी ) मोर्चाचे प्रदेश सदस्य राजेंद्र वाघ धरणगाव यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम