धरणगाव येथे चोरीस गेलेल्या ७ दुचाकी जप्त;गोपनीय विभागाची उल्लेखनीय कामगिरी
धरणगाव येथे चोरीस गेलेल्या ७ दुचाकी जप्त;गोपनीय विभागाची उल्लेखनीय कामगिरी
धरणगाव येथे चोरीस गेलेल्या ७ दुचाकी जप्त;गोपनीय विभागाची उल्लेखनीय कामगिरी
धरणगाव येथील गोकुळ काशिनाथ गवारे रा.समर्थ नगर,धरणगांव यांच्या फिर्यादीवरुन ३०हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात आरोपीने रेल्वे स्टेशन परिसरातून चोरी झाल्याबाबत धरणगाव पोलिस स्थानकात अज्ञात आरोपीविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.या घटनेबाबत पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी सदर गुन्हाच्या तपासाबाबत योग्य ते मार्गदर्शन करुन गुन्हा उघडकीस आणण्यासाठी सुचना दिल्याने सपोनि जिभाऊ पाटील,पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांनी गुन्हयाचा सखोल तपास सुरु केला होता.गुन्ह्याच्या तपासात गोपनिय विभागाचे पो.ना.वैभव बाविस्कर,शामराव भिल व प्रमोद पाटील यांनी मिळविलेल्या माहितीवरून आरोपी नामे यश दिनेश सातपुते,तुषार महेंद्र बत्तीसे, वैभव उर्फ विकी हेमंत चौधरी,मनीष ऊर्फ भुर्या योगेश चौधरी,सय्यद पीरण सय्यद मुक्ता,वैभव उर्फ दादू सुरेश मोरे,हसन उर्फ अली मोहम्मद शेख,वसीम शेख बिस्मिल्ला रा.धरणगाव यांना पोना समाधान भागवत,विनोद संदानशिव,उमेश पाटील,वैभव बाविस्कर अशांनी ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन गुन्हाबाबत सखोल चौकशी केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली देवुन गुन्ह्यातील ४ मोटारसायकल व ३ मोटरसाकलचे कापलेले स्पेअर पार्ट असे धरणगाव व धुळे येथून जप्त केले आहेत.याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून गु.र.क्र. ०१५२/२०२२ भा.द.वि. कलम ३७९, ४११, ३४ प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शोध पथकातील अंमलदार करीत आहेत.पोलिसांनी एकाच वेळी ७ दुचाकी जप्त केल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.आरोपी व जप्त केलेल्या मोटारसायकल सोबत चोपडा विभागीय अधिकारी भास्करराव डेरे,पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सपोनि जिभाऊ पाटील,उप निरीक्षक अमोल गुंजाळ,स फौ.करीम सय्यद,हवालदार नाना ठाकरे,संजय सूर्यवंशी,प्रमोद पाटील,समाधान भागवत,वैभव बाविस्कर,उमेश पाटील,विनोद संदांशिव,श्यामराव भिल, सुभाष मराठे,राहुल बोरसे,अरुण सातपुते
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम