Pushpa 2मधून रश्मिका मंदाना बाहेर?

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I २२ डिसेंबर २०२२ I साऊथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली.

पहिला भाग ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या सीक्वलची सातत्याने चर्चा ऐकायला मिळते. या चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये रिलीज झाला होता. जो ब्लॉकबस्टर ठरला होता. त्याचवेळी, आता या चित्रपटाच्या आगामी भागाबाबत सातत्याने चर्चा ऐकायला मिळत होत्या. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना ला ‘पुष्पा २’ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. म्हणजेच पुष्पा: द रुल चित्रपटात रश्मिका मंदानाच्या जागी दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची वर्णी लागल्याचे समजते आहे.

‘पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसली होती. अर्जुनसोबत तिचा जबरदस्त रोमान्स होता आणि चाहत्यांना दोघांची केमिस्ट्री चांगलीच भावली होती. त्याचवेळी श्रीवल्लीच्या भूमिकेसाठी रश्मिकाचे कौतुकही झाले होते. पण आता अल्लू अर्जुन चित्रपटात आहे. मात्र रश्मिकाला या चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असल्याची सध्या चर्चा आहे.

मात्र, या सर्व वृत्तांना अद्याप दुजोरा मिळालेला नाही. एवढेच नाही तर साईच्या भूमिकेचे तपशीलही समोर आले आहेत. या चित्रपटात साई पल्लवीची २० मिनिटांची आदिवासी मुलीची भूमिका असणार आहे. पुष्पा २ चित्रपटात अल्लू अर्जुन, साई पल्लवी आणि रश्मिका मंदाना या त्रिकुटांना एकत्र काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम