हि साऊथ इंडियन अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I ११ डिसेंबर २०२२ I तमिळ चित्रपट अभिनेत्री साई पल्लवी तिच्या साधेपणाने आणि सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अभिनेत्री तिच्या चित्रपटातील पात्रांबाबतही खूप सजग असते. हेच कारण आहे की ती अत्यंत निवडकपणे तिचे चित्रपट साइन करणं पसंत करते. आता अभिनेत्री सई पल्लवी लवकरच बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीकडे वाटचाल करू शकते. अभिनेत्री सई पल्लवी सुपरस्टार रणबीर कपूर स्टारर चित्रपटातून बॉलीवूडमध्ये प्रवेश करणार असून या चित्रपटात ती सीता माताची भूमिका साकारणार असल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत दक्षिणेतील चित्रपट निर्माता अल्लू अरविंद यांच्या रामायणाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

रामायणावर आधारित चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून या चित्रपटाच्या स्टार कास्टबाबत विविध अफवा इंटरनेटवर व्हायरल झाल्या आहेत. आता अशी चर्चा आहे की साऊथ अभिनेत्री साई पल्लवी (साईपल्लवी सेंथामराय) ‘रामायण’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम