कशी सुरु झाली विरुष्काची लव्हस्टोरी ?

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I ११ डिसेंबर २०२२ I विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे लग्न एखाद्या परीकथेपेक्षा कमी नव्हते. तिच्या लग्नात अनुष्का स्वतः राजकन्येसारखी दिसत होती. तर विराटनेही राजकुमाराप्रमाणे येऊन आपल्या राजकुमारीशी लग्न केले. या जोडप्याने 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले आणि नंतर भारतात, या जोडप्याने दिल्ली आणि मुंबई येथे भव्य रिसेप्शन आयोजित केले ज्यात सेलिब्रिटींनी हजेरी लावली. हे स्टार कपल आज त्यांच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची पहिली भेट खूपच रंजक होती. 2013 मध्ये एका अॅड शूटच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. विराट कोहलीने मुलाखतीत सांगितले होते की, अनुष्कासोबतच्या पहिल्या भेटीत तो खूप घाबरला होता आणि त्याने अनुष्काशी बोलण्यासाठी एक विनोद केला.अनुष्काच्या अशा प्रतिक्रियेनंतर विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.

 

2014 मध्ये विराटने मेलबर्नमध्ये शतक झळकावले होते. हा सामना पाहण्यासाठी अनुष्काही पोहोचली होती. शतक पूर्ण केल्यानंतर विराटने स्टेडियममध्ये उपस्थित अनुष्काला फ्लाइंग किस दिला. या सामन्यानंतर दोघांमधील जवळीक वाढू लागली. 11 डिसेंबर 2017 रोजी विराट आणि अनुष्काचे लग्न झाले.

डिसेंबरमध्ये विरुष्काचे ज्या रिसोर्टमध्ये लग्न झाले ते खास त्यांच्यासाठी खुले करण्यात आले होते. अन्यथा हा रिसॉर्ट नेहमी एप्रिलमध्ये उघडतो. लग्नासाठी केवळ 50 खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम