सर्व एसटी कर्मचाऱ्यांकडे एकाचवेळी प्लॅटफॉर्म तिकीट कुठून आले? राऊतांचा सवाल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ९ एप्रिल २०२२ । आता जे आंदोलक आझाद मैदानातून रेल्वे स्थानकावर बसले आहेत. या सर्वांकडे एकाच वेळी प्लॅटफॉर्म तिकीट कसे असू शकते? कोणती यंत्रणा आहे ही? कोणती यंत्रणा काम करत आहे. कोणता राजकीय पक्ष त्यांना पोसत आहे?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. कामगाारांबाबत आम्हाला सहानभूती आहे. कामगारांच्या रक्ताततून श्रमातून शिवसेना तयार झाली, महाराष्ट्र तयार झाला. पण कामगारांचा एक गट भडकवून सरकार विरोध महाराष्ट्रा विरुद्ध जी काही गरळ ओकण्याचा हल्ले करण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे विरोधकांना वाटत असेल तिरंदाजी मारत आहेत तर ते भ्रमात आहेत, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेऊन कालच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

एक मात्र नक्की, काल जो प्रकार घडला ते आंदोलन नव्हतं, तो हल्ला होता. हल्ला करण्याच्या उद्देशाने कुणाच्यातरी पासून प्रेरणा घेऊन त्यांनी हे केलं, त्यांनी कामगार चळवळीचं नाव बदनाम केलं. इंटेलिजन्स फेल्युअर हा घोळ आहे, हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. ते सरकार पाहील. मात्र कामगारांनी आणि त्यांच्या नेत्यांनी प्रमुख नेत्यावर हल्ला करुन गुन्हा केला, असा दावा संजय राऊत यांनी केला.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम