भारतातून गहू व साखरेची निर्यात वाढली भावात तेजीचे संकेत

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर । ९ एप्रिल २०२२ । रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. युद्धामुळे पुरवठा साखळी प्रभावीत झाली आहे. खाद्य पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होताना दिसत आहे. मात्र हे सर्व वातावरण भारतीय शेतकरी आणि निर्यातदारांच्या पथ्यावर पडणारे आहे. केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चालू वर्षात रेकॉर्डब्रेक साखरेची निर्यात झाली आहे. त्याच प्रमाणात गव्हाची देखील निर्यात वाढली असल्याचे खाद्य सचिव सुधांशु पांडे यांनी म्हटले आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या आर्थिक वर्षात भारताने प्रचंड प्रमाणात साखरेची निर्णयात केली आहे. आर्थिक वर्ष २०२० – २०२१ च्या तुलनेत मागील आर्थिक वर्षात आपण अधिक साखरेची निर्यात तसेच उत्पादन केल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. यंदा आपण साखर निर्यातीमध्ये 80 लाख टनाचा टप्पा गाठू असा विश्वासही यावेळी पांडे यांनी व्यक्त केला आहे. तसेच एप्रिल २०२२ पासून ते जुलै २०२२ पर्यंत भारत ३० ते ३५ लाख टन गव्हाची निर्यात करणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

८० लाख टनांपेक्षा अधिक साखरेची निर्यात होण्याची शक्यता आहे. २०२०-२१ मध्ये भारताने ७२.३ लाख टन साखरेची निर्यात केली होती. भारत हा साखर उत्पादक देशांपैकी एक प्रमुख देश आहे. भारतामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होते. मात्र म्हणावी तशी विक्री होताना दिसत नाही.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम