जिल्ह्याच्या व तालुक्याच्या पत्रकारिते बाबत अभिमान व्यक्त करत साहित्यिक उत्तम कांबळे यांनी वैद्य सरांना आदरांजली अर्पण केली.

जिल्ह्याच्या व तालुक्याच्या पत्रकारिते बाबत अभिमान व्यक्त करत साहित्यिक उत्तम कांबळे यांनी वैद्य सरांना आदरांजली अर्पण केली.

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर। १९ मार्च २०२२|देशात अहमदनगर जिल्ह्याची आणि जिल्ह्यात अकोलेची पत्रकारिता जिल्ह्यात प्रथम क्रमांकाची आहे. तर प्रा. डी. के. वैद्य हे या बातमीदारी बरोबरच समाजसेवक होते, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील असत. त्यामुळेच ते लोकप्रिय होते, अशा शब्दांत जिल्ह्याच्या व तालुक्याच्या पत्रकारिते बाबत अभिमान व्यक्त करत साहित्यिक उत्तम कांबळे यांनी वैद्य सरांना आदरांजली अर्पण केली.

यावेळी विधानसभा सदस्य डॉ.सुधीर तांबे, अकोले तहसील वार्ताहर संघाचे अध्यक्ष विजय पोखरकर, विश्‍वस्त भाऊसाहेब मंडलिक, प्रकाश टाकळकर, शांताराम गजे, अकोलेच्या नगराध्यक्षा सौ. सोनाली नाईकवाडी, प्रा.डॉ.अनिल सहस्रबुद्धे, हेरंब कुलकर्णी, जे.डी.आंबरे पाटील, मीनानाथ पांडे, बी. जे. देशमुख, ह. भ. प. दीपक महाराज देशमुख हे व्यासपीठावर होते.अनेकवेळा आपण असे लोक पाहतो की ज्यांना वार्ताहर आवडत नाही, पण जे वार्ताहर त्या बातमीतच जगायला शिकले, सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, ते समाजाचे लोकप्रिय वार्ताहर झाले. वैद्य सर हे देखील त्यापैकीच एक. माझा 4 हजार वार्ताहरांशी संपर्क होता, त्यात वैद्य सरांची ओळख काहीशी वेगळी आहे.

बातम्या लिहिणे ही काही मोठी गोष्ट नाही. पण बातम्यांमागील बातम्या शोधून संबंधितांना न्याय देण्याचा प्रयत्न करणे, याला पत्रकारिता म्हणता येईल आणि असेच वैद्य सरांचे कार्य होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम