धरणगाव रेल्वे स्टेशन येथे सुसज्जित जल मंदिराचे लोकार्पण
धरणगाव रेल्वे स्टेशन येथे सुसज्जित जल मंदिराचे लोकार्पण
धरणगाव रेल्वे स्टेशन येथे सुसज्जित जल मंदिराचे लोकार्पण
धरणगाव येथे रेल्वे स्टेशनवर दोन्ही फलाटावर वॉटर फिल्टर,कुलिंग असे सुसज्ज असलेले दोन जल मंदिराचे लोकार्पण माऊली शिक्षण संस्थेचे महामंडलेश्वर महंत भगवानबाबा यांच्या हस्ते करण्यात आले.धरणगाव रेल्वे स्टेशनवर पिण्याच्या पाण्याची सुसज्ज अशी व्यवस्था नव्हती,राजपूत समाज अध्यक्ष जिवन आप्पा बयस यांनी प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन आज धरणगाव रेल्वे स्टेशन येथे स्व .ज्योतीताई जिवन बयस याचा नावाने सुसज्ज अशी दोन जल मंदिराचे (पाणपोई) लोकार्पण करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रा.आर.एन.महाजन,डी.आर.पाटील,गुलाबराव वाघ,डी.जी.पाटील,सुरेश चौधरी,जिवन सिंग बयस,भानुदास विसावे ज्ञानेश्वर महाजन,प्रताप पाटील,सी.के.पाटील,बबलु कोठारी,नयन गुजराती,रेल्वेचे शुक्ला,मुकेश बयेस,नगरसेवक सुरेश,विजय महाजन,अहमद पठाण,भागवत चौधरी,जितेंद्र धनगर,किरण मराठे,राजेंद्र महाजन,धिरेन्द्र पुरभे,किरण अग्निहोत्री,राहुल रोकडे,संजय चौधरी,किरण पाटील,बंठी पवार,एच,डब्लु.पाटील,रविन्द्र भागवत,किरण वाणी,पत्रकार आर.डी.महाजन,विजय वाघमारे.आबा वाघ,भगीरथ माळी,विनोद रोकडे, विजय शुक्ल,सतिष बोरसे या सह असंख्य पदाधिकारी तसेच राजपूत समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रवासी मंडळाच्या वतीने जिवन आप्पा व मुकेश बयस यांच्या सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी बयस,चंदेल,चव्हाण परीवारातील सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले,प्रास्ताविक जितेंद्र बयस यांनी केले तर सुत्रसंचलन महेश अहेरराव यांनी केले.आभार मुकेश बयस यांनी मानले
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम