कृष्ण गीता नगर मध्ये सुविधा नाही,तर कर भरणार नाही
कृष्ण गीता नगर मध्ये सुविधा नाही,तर कर भरणार नाही
कृष्ण गीता नगर मध्ये सुविधा नाही,तर कर भरणार नाही
वारंवार निवेदन देऊन देखील कोणीही दखल घेत नाही – कृष्णा गीता नगरवासी
धरणगांव आज रोजी कृष्ण गीता नगरवासीयांनी धरणगाव नगरपरिषद येथे कर कमी करण्याबाबतचा विनंती अर्ज दिला. धरणगाव शहरातील नगरपालिका हद्दीतील कृष्ण गीता नगर गट नंबर ५४६ मधील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि कॉलनी वासी व ज्येष्ठ नागरिक शाळेतील मुलं यांना जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. काही दिवसांपूर्वी तर एक ज्येष्ठ नागरिक गाडीवरून पडून त्याला मोठी जखम झाली. शालेय विद्यार्थी देखील अनेकदा सायकलीवर शाळेत जात असतांना पडलेले आहेत.कॉलनी वासीयांतर्फे मागील काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब, नगर परिषदेचे प्रशासक जनार्दन पवार साहेब यांना अनेकदा निवेदन देऊन देखील आजपर्यंत कुठलीही कार्यवाही झालेली नाही. कॉलनीवासी दरवर्षी न चुकता नगरपालिकेची नियमित घरपट्टी भरून देखील ही अवस्था आहे. कॉलनीत कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. आता कॉलनी वासीयांनी एकमताने ठरविले की, आपल्या कॉलनीत सुविधा नाही !… तर कर भरणार नाही !….
याप्रसंगी कृष्ण गीता नगर मधील सर्व कॉलनिवासी उपस्थित होते.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम