धरणगाव काँग्रेस कमिटीतर्फे अग्निपथ योजनेचा जाहीर निषेध
धरणगाव काँग्रेस कमिटीतर्फे अग्निपथ योजनेचा जाहीर निषेध
धरणगाव काँग्रेस कमिटीतर्फे अग्निपथ योजनेचा जाहीर निषेध
धरणगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आणलेल्या अग्निपथ योजनेला विरोध करण्यासाठी काँग्रेसचे ओबीसी जिल्हाध्यक्ष डॉ.व्ही डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने बस स्थानक समोरील जुनी पंचायत समिती जवळ धरणे आंदोलन करण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रीयेत बदल करून शासनाने नुकतीच अग्निपथ ही योजना जाहीर केली आहे .या गोंधळलेल्या योजनेमुळे देशातील तरुणांचे भावित्वय धोक्यात आले आहे .केंद्र शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे देशातील युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाले आहे .या अग्निपथ योजनेच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत आहे .या अग्निपथ योजनेविरोधात आंदोलन करीत केंद्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.या धरणे आंदोलनात डॉ.व्ही डी पाटील,ज्येष्ठ नेते सुरेश भागवत,रामचंद्र माळी,शरद बडगुजर,दगडु पाटील,मंगल सोनवणे,यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम