उद्धव ठाकरे यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा
मुंबई चौफेर | २२ नोव्हेंबर २०२२ | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिल्याने ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला..
न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी आज पार पडली. उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचा आरोप करत गौरी भिडे यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी एवढी मालमत्ता कशी जमवली आहे, त्यांच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय आहे याची चौकशी व्हावी. त्यांच्याकडे असलेली संपत्ती कुठून आली याची माहिती सर्वांना मिळायला हवी, असा आरोप भिडे यांनी केला होता.
दरम्यान, प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सामना वृत्तपत्राचा करोना काळातील टर्नओव्हर ४२ कोटी रुपये होता. या काळात सर्व वृत्तपत्र तोट्यात असताना सामना नफ्यामध्ये होता. या सर्वांची चौकशी व्हावी अशीही मागणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केली होती.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम