शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार, 18 आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, वाचा यादी
महाराष्ट्र सरकारच्या एकनाथ शिंदे मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळात 18 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात राज्यपालांनी शिंदे गटातील आणि भाजपच्या 9-9 मंत्र्यांना शपथ दिली.एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आज 18 नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात सर्व मंत्र्यांना शपथ दिली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात 18 नवीन मंत्री सामील झाले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात सर्व नवीन मंत्र्यांना शपथ दिली. सुमारे दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रात शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यापूर्वीच्या उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनाही शिंदे मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सर्वांना शपथ दिली. विशेष म्हणजे शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये एकाही महिला मंत्र्याचा समावेश नाही. एका अहवालानुसार, शिंदे यांच्या मंत्रिमंडळात जवळपास सर्वच करोडपती मंत्री आहेत. त्यातही 70 टक्के मंत्री याच्यावर गुन्हे दाखल आहेत.
शिंदे गटाचे मंत्री
1. दादा भुसे
2. संदीपान भुमरे
3. उदय सामंत
4. तानाजी सावंत
5. दीपक केसरकर
6. शंभूराजे देसाई
7. अब्दुल सत्तार
8. गुलाबराव पाटील
9. संजय राठोड
भाजपचे मंत्री
1. सुधीर मुनगंटीवार
2. चंद्रकांत पाटील
3.राधाकृष्णविखे पाटील
4. गिरीश महाजन
5. अतुल सावे
6. विजयकुमार गावित
7. मंगलप्रभात लोढा
8. सुरेश खाडे
9. रवींद्र चव्हाण
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम