तृप्तीचा ग्लॅमरस लूक आला समोर

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १३ डिसेंबर २०२२ I आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित कला या सिनेमाचे खुप कौतुक होत आहे. यातला मुख्य चेहरा अभिनेत्री तृप्ती डिमरीवर चाहते घायाळ झालेत.

कला मध्ये साधी, भोळी दिसणारी तृप्ती खऱ्या आयुष्यात खुपच ग्लॅमरस आहे.तृप्ती हिमाचलची असून २०१७ मध्ये आलेल्या पोस्टर बॉइज सिनेमातून तिने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. यानंतर २०२० मध्ये ती बुलबुल सिनेमातही झळकली.कला या चित्रपटातील तिच्या अभिनयामुळे तिला आज वेगळी ओळख मिळाली आहे. याआधी तिने साजिद खानच्या लैला मजनू चित्रपटातही भुमिका केली आहे.तृप्ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिने अनेक फोटो पोस्ट केले आहेत ज्याला आता चाहत्यांची पसंती मिळत आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम