अभिनेत्री श्रद्धा कपूरचा नवा व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I १४ डिसेंबर २०२२ I ‘आशिकी 2’ सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर आज बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.

‘साहो’, ‘एक विलन’, ‘स्त्री’, ‘ABCD 2’, ‘भेडिया’ अशा अनेक सिनेमांमधून श्रद्धाने आपल्या अभिनयाची जादू चाहत्यांना दाखवली. श्रद्धा फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही, तर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी श्रद्धाचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. आजही अभिनेत्रीचं खासगी आयुष्य चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय असतो.

याचदरम्यान श्रद्धाने इन्स्टाग्रामरवर केलेली एक पोस्ट तुफान चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने ताकद म्हणजे काय असतं हे सांगितलं आहे. व्हिडीओमध्ये श्रद्धाने पैठणीपासून शिवलेला ब्लेझर आणि ट्रॉऊझर पॅन्ट घातली आहे. व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, ‘पैठणी ताकद…’ असं लिहिलं आहे.

 

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम