या अभिनेत्रीला करायचे आहे साऊथ सिनेमांमध्ये काम

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर I ११ डिसेंबर २०२२ Iनुकताच परिणीती हिने मोठी इच्छा व्यक्त केलीये. परिणीती म्हणाली की, मला माझ्या करिअरमध्ये एक तरी साऊथचा चित्रपट करण्याची प्रचंड इच्छा आहे. मी साऊथच्या चित्रपटाच्या स्क्रीप्टची वाट पाहात आहेत.

इतकेच नाहीतर परिणीती पुढे म्हणाली की, खरोखरच मी साऊथ चित्रपट करण्यासाठी मरत आहे….तमिल, तेलुगू, मलयालम किंवा कन्नड अशा कोणत्याही भाषेतील चित्रपट करण्याची माझी प्रचंड इच्छा आहे.

मला साऊथच्या मोठ्या स्टारसोबत चित्रपट करायचा आहे. मी फक्त चांगला चित्रपट, चांगली स्क्रीप्ट आणि चांगल्या निर्मात्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहे. मला फक्त आणि फक्त साऊथच्या चित्रपटामध्ये काम करायचे आहे.

मला असे वाटते की, साऊथमध्ये जबरदस्त चित्रपट तयार केले जात आहेत. यामुळेच मला साऊथ चित्रपटामध्ये काम करायचे आहे. जर कोणी एखाद्या मोठ्या साऊथच्या चित्रपट निर्मात्याला ओळख असेल तर खरोखरच माझा विचार करा.

गेल्या काही दिवसांपासून साऊथचे चित्रपट हे बाॅक्स आॅफिसवर धमाका करत आहेत. यामुळे बाॅलिवूडमधील अनेक कलाकार हे साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सुक आहेत. आता त्या नावामध्ये परिणीती चोप्राचा देखील समावेश झालाय.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम