लीना नागवंशीच्या आत्महत्या प्रकरणाने खळबळ
मुंबई चौफेर I २८ डिसेंबर २०२२ Iतुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणाला 4-5 दिवस उलटून जात नाही तर आता छत्तीसगडमधील लीना नागवंशीच्या आत्महत्या प्रकरणाने मनोरंजन विश्वात खळबळ उडवून दिली आहे. ख्रिसमला तिने एक छान रील बनवून इन्स्टाग्रामवर पोस्टही केले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या ४८ तासांत असं काय घडलं की तिने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
कोण आहे लीना नागवंशी
लीना रायगडच्या केलो बिहार कॉलनीत राहत होती. ती बी.कॉमच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी होती. ती छत्तीसगडची प्रसिद्ध इंस्टाग्राम सेलिब्रिटी आहे. तिचे इंस्टाग्रामवर 10.8k पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिचं रॉयल लीना यूट्यूबवर चॅनल असून ती नेहमी तिचे व्हिडिओ शेयर करत होती.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम