लक्ष्मण पाटील यांना तात्यासाहेबांच्या स्मृतिदिनी समता शिक्षक परिषदेतर्फे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर

२५ डिसेंबर, २०२२ रोजी जळगाव येथे होणार पुरस्काराचे वितरण
धरणगांव : येथील गुड शेफर्ड अकॅडमी स्कूलचे उपशिक्षक, शिवव्याख्याते लक्ष्मण पाटील यांची सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र समता शिक्षक परिषद यांच्यातर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी ” जिल्हास्तरीय सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार ” जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भरत शिरसाट यांनी सदर पुरस्काराची घोषणा केली आहे.पुरस्काराचे वितरण जळगाव येथे २५ डिसेंबर २०२२ रोजी होणार आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री.पाटील यांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन व कौतुक होत आहे. याबाबत लक्ष्मण पाटील म्हणाले की, पुरस्काराने ऊर्जा मिळते. शिक्षणाचे आद्य जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनी मला “सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला याचा मला मनस्वी आनंद आहे. शिवराय – फुले – शाहू – आंबेडकर विचार मनामनात आहे आणि ते सामान्यांपर्यंत पोहोचवीत आहोत. माझ्या शैक्षणिक सामाजिक कार्याची पावती आहे असे प्रतिपादन श्री.पाटील यांनी केले.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम