सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात धर्मप्रसार !
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात धर्मप्रसार ! https://wp.me/pdHzYz-n1
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात धर्मप्रसार !
मुंबई चौफेर| ४ एप्रिल २०२२|जळगाव, २ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त जिल्ह्यात सामूहिक गुढी उभारणे, भित्तीपत्रके लावणे, फलकलेखन करणे आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना शुभेच्छा देत धर्मप्रसार करण्यात आला. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जळगाव शहरातील टॉवर चौक, जुना खेडी रोड तसेच मोठा वाघोदा, यावल, आवार, खर्ची, पाळधी, एकलग्न, चोपडा आणि नंदुरबार येथे सामूहिक गुढी उभारून ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची’ प्रतिज्ञा घेण्यात आली. सनातन संस्थेच्या वतीने पाचोरा येथील शिवसेना आमदार श्री. किशोर (आप्पा) पाटील तसेच फेकरी गावच्या सरपंच सौ. चेतना भिरुड यांची सदिच्छा भेट घेत त्यांना हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. जळगाव शहरातील ऑटो रिक्शावर गुढीपाडव्याचे ५० पत्रक लावून धर्मप्रसार करण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी असलेले ५ फलक लिहून जनजागृती करण्यात आली.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम