खड्डयाचे जलपुजन व वृक्षारोपण करून उपोषणास प्रारंभ करणार- राजेंद्र वाघ

खड्डयाचे जलपुजन व वृक्षारोपण करून उपोषणास प्रारंभ करणार- राजेंद्र वाघ

बातमी शेअर करा

सा.बां.विभाग असमर्थ ठरल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते राजेंद्र वाघ यांचे उपोषण

खड्डयाचे जलपुजन व वृक्षारोपण करून उपोषणास प्रारंभ करणार- राजेंद्र वाघ

धरणगाव येथे गेल्या वर्षांपासुन धरणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने उड्डाण पुलापासून ते धरणी नाला पुलापर्यंत, शहरातील प्रमुख रस्त्याचे उद्घाटन होऊन काँक्रिटीकरणाचे व डिव्हाईडरची कामे सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली कामे अर्धात थांबवून कामे बंद करण्यात आली व जे रस्ते तयार केलेत, त्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे आजतागायत रस्त्यांचे कामे करण्यास धरणगाव बांधकाम उपविभाग असमर्थ ठरल्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे विभागीय जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ व संघटनांच्या वतीने दि.२३ जुलै, २०२२ शनिवार पासून उपोषणास बसणार आहेत.

दि. २३ जुलै रोजी शहरातील गूड शेफर्ड इंग्लिश स्कूल, उड्डाण पूल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, बस स्थानक, व्हाईट हाऊस, मटन मार्केट, पारोळा नाका, पाटील वखार, भूमी गार्डन जवळील ( पाटाच्या पुलाजवळ ) रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामधील पाण्याचे जलपुजन करून वृक्ष लावून आंदोलन करण्यात येणार आहे. तद्नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जवळ उपोषणास बसणार आहे. गेल्या वर्षभरापूर्वी शहरातील प्रमुख रस्त्याचे उद्घाटन करून कामे सुरू करण्यात आली होती. मात्र सुरू असलेली कामे अर्ध्यात थांबवून कामे बंद करण्यात आली ती आजतागायत रस्त्यांचे व डिव्हाईडर ची कामे पूर्ण करण्यात आली नाही.सदर रस्त्याच्या व डिव्हाईडर चे कामासंदर्भात विचारणाबाबत मा. सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता सो, यांच्या कार्यालयात गेल्या आठ दिवसांपासून आम्ही निरंतर भेट घेण्याचा प्रयत्न केला परंतु, मा.अभियंता सो, मिळून आले नाहीत. यामुळे धरणगावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाघ व सामाजिक संघटना यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबविला आहे.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम