वाशिम जिल्हयात सर्वात मोठा सामुहिक विवाह सोहळा फेबु्रवारी 2023 मध्ये होणार
मुंबई चौफेर | ७ एप्रिल २०२२ | गत दोन वर्षापासून कोरोनामुळे संपूर्ण अर्थव्यवस्था डबघाईस निघाली आहे. अनेकांचे रोजगार कोरोनाने हिरावून घेतले. अनेकांच्या घरी दोन वेळेच्या जेवनाणी सोय करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या पार्श्वभूमिवर सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी एका मंचावर येवून वाशीम जिल्हयात नव भुतो न भविष्यती अशा सर्वात मोठा सामाहिक विवाह सोहळा फेबु्रवारी महिण्यात सुभद्राआई बहुउददेशीय संस्था यांच्या नेतृत्वात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मंगळवार 5 एप्रिल रोजी स्थानिक शिवाजी चौक येथे कोठारी प्रिटींग प्रेसवर झालेल्या बैठकीत अध्यक्षस्थानी संयोजक मनपा नगरसेवक संजु आधार वाडे होते. बैठकीला व्यापारी मंडळ, जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, तरूण क्रांती मंच जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, वाशीम जिल्हा माहेश्वरी संघटन जिल्हाध्यक्ष शिवलाल भुतडा, समाजसेवी सुनिल मिसर, कुरेशी समाज संघटना वाशीम जिल्हाध्यक्ष इरफान कुरेशी, भारतीय जैन संघटना प्रदेश प्रतिनिधी शिखरचंद बागरेचा, मराठा मंडळचे अॅड. सुरेश टेकाळे, सावतामाळीचे संजीव भांदुर्गे, पदवीधर संघटनेचे संदीप डोंगरे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी समाजसेवी संजु वाडे यांनी सांगितले की, वाशीम जिल्हयात मोठया प्रमाणात शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत. मंगरूळपीर तालुक्यात एका पित्याने मुलीच्या लग्नानंतर कर्जापोटी आत्महत्या करण्याच्या घटना घडली. त्यानंतर त्यांना सामुहिक विवाह सोहळा आयोजनाचा प्रेरणा मिळाली आहे.
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम