शिव संवाद यात्रेत गुलाबराव पाटलांच्या किल्ल्यात आदित्य ठाकरेंची चढाई…

शिव संवाद यात्रेत गुलाबराव पाटलांच्या किल्ल्यात आदित्य ठाकरेंची चढाई

बातमी शेअर करा

शिव संवाद यात्रेत गुलाबराव पाटलांच्या किल्ल्यात आदित्य ठाकरेंची चढाई

गद्दारांना जराही लाज असेल तर राजीनामा देऊन जनतेसमोर यावे; आदित्य ठाकरे

निष्ठावंत शिवसैनिकांना धमकी दिली जात आहे; माजी नगराध्यक्षा उषा वाघ

धरणगाव : युवा सेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे शनीवारी शिव संवाद यात्रा उत्साहात पार पडली. यानिमित्ताने कार्यक्रमादरम्यान प्रचंड गर्दी होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. शरद माळी यांनी केले. श्री. ठाकरे यांना ऐकण्यासाठी कॉम्प्लेक्स व इमारतीच्या गच्चीवरही लोक जमले होते. आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसला. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड चैतन्य संचारले होते. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला आणि भाषणांना मिळणारा प्रतिसाद असाच वाढत राहिला तर शिंदे गटासाठी ही नक्कीच चिंतेची बाब ठरू शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या गड असलेल्या धरणगाव मतदार संघातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकजवळ आदित्य ठाकरे यांचा संवादाचा कार्यक्रम झाला. यावेळी धरणगाव व ग्रामीण मतदार संघात शिवसैनिकांमध्ये कमालीचे चैतन्य संचारल्याचे दिसले. आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतील धरणगावात सर्वात मोठी गर्दी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला आणि भाषणांना मिळणारा प्रतिसाद असाच वाढत राहिला तर शिंदे गटासाठी ही नक्कीच चिंतेची बाब ठरू शकते. ‘गद्दारांनी प्रश्न विचारायचे नसतात, तुमची तेवढी लायकी नाही’ आदित्य ठाकरे यांनी शनिवारी धरणगावातील सभेत मंत्री शिंदेंसह गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता सडकून टीका केली. मी गद्दारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. कारण गद्दारांना प्रश्न विचारायचा अधिकार आणि त्यांची तेवढी लायकीही नसते, बंडखोरी केलेल्यांना थोडीही लाज असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन जनतेसमोर यावे. अशा घणाघाती शब्दांत शिवसेना नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर प्रहार केला. बंडखोर म्हणतात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमच्याशी भेटत नव्हते, अरे हे काय तुमचं म्हणणं झालं..? तुम्ही गद्दार नसतात तर मी तुमच्या आरोपांना, प्रश्नांना उत्तरं दिली असती. शिवसैनिकांनी प्रश्न विचारले तर मी त्याला उत्तर दिलं असतं. तुम्ही पहिले गद्दारी का केली, याचं उत्तर द्या, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना खडसावले. आदित्य ठाकरे हे वारंवार बंडखोरांना ‘ गद्दार ‘ म्हणून डिवचत आहेत. आजच्या सभेतही आदित्य ठाकरे यांनी त्याचा पुनरुच्चार केला. सरकार चालवताना आपण मुंबईला सगळ्यात जास्त लक्ष दिलं. उद्धव ठाकरे चांगला माणूस असं लोकं म्हणतात. असं बरबटलेलं राजकारण पाहून तरुणांना राजकारणात यावंसं वाटेल का ? कोणत्याही गटाचा शिक्का मारला तरी गद्दार हे गद्दारच असतात. गद्दार हाच खरा शिक्का, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. शिव संवाद यात्रेचे आयोजन दरम्यान यात्रेचे स्वरूप आले होते. तत्पूर्वी शिवसेना सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे, कारभारी अहिर, तालुका प्रमुख विजय पाटील, नगराध्यक्ष निलेश चौधरी, जानकीराम पाटील, सौ.रचना पाटील, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, नाना ठाकरे, हेमंत सपकाळे, संतोष सोनवणे आदींनी आपल्या भाषणात कडाडून टीका केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद रोकडे, किरण अग्निहोत्री यांनी तर आभार शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मानले.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम