पिक विमा व अतिवृष्टीच्या अनुदानाच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेची धरणगाव तहसीलदार व तालुका कृषी कार्यालयावर धडक

पिक विमा व अतिवृष्टीच्या अनुदानाच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेची धरणगाव तहसीलदार व तालुका कृषी कार्यालयावर धडक

बातमी शेअर करा

पिक विमा व अतिवृष्टीच्या अनुदानाच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेची धरणगाव तहसीलदार व तालुका कृषी कार्यालयावर धडक

धरणगाव तालुक्यात मागील वर्षी सन 2021-2022 या वर्षामध्ये गंगापुरी व तालुक्यातील इतर गावामध्ये अती पर्जन्य वृष्टी झाली होती.त्यामुळे सोनवद महसूल मंडळातील गंगापुरी व शेजारील परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते.पण नुकसान होवून देखील नुकसानीचे अनुदान तालुक्यातील काही मंडळांनाच अनुदान मिळाले मात्र इतर महसूल मंडळांना अजून पर्यंत एकहि हफ्ता वगैरे देण्यात आलेला नाही.

तरी तालुक्यातील इतर गावांना व महसूल मंडळांना देखील अनुदान मिळावे या मागणीसाठी तालुक्याचे शेतकरी तालुक्याचे शेतकरी नेते श्री राजेन्द्र किसन पाटील यांनी आपल्या धरणगाव तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार श्री लक्ष्मण सातपुते यांना भेटून कैफियत मांडली. तसेच सदर मागणीचे निवेदन शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आले. प्रसंगी सदर मागणीचे निवेदन कृषी विभाग धरणगाव यांना देखील देण्यात आले. यावेळी राजेन्द्र किसन पाटिल, विकास काशिनाथ पाटील, हेमकांत्त माधवराव पाटील, प्रदीप शिवाजी पाटिल, दीपक मधुकर पाटिल, उखडवाडी चे सरपंच गणेश पाटील, तसेच भांबर्डी, सोनवद, तरडे, पष्टाने आदी पंचक्रोशीतील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम