इन्फोसिस आयटी कंपनीत गंगायत्री यांची पाटील निवड
।इ मुंबई चौफेर ।७ एप्रिल २०२२।इन्फोसिस या जगप्रसिद्ध कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हल्पमेंट इंजिनिअर पदी निवड करण्यात आली, नंदाने गावातील सामान्य कुटुंबातील आणि एस एस व्ही पी एस शिवाजीराव देवरे कॉलेज ऑफ इंजीनिअर देवपूर धुळे येथील मेकॅनिकल इंजिनिअर च्या शेवटच्या वर्षाला गंगायत्री शिकत आहे, तिची पुणे येथील इन्फोसिस कंपनीत निवड झाली असून तिला सुरूवातीला ३.६ लाख पॅकेज मिळाले आहे ,तिचे वडील नंदाणे गावाचे माजी सरपंच राहिलेले आहेत, तर आई गृहिणी व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, कॉलेज ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या इतिहासातील हे मोठे यश मानले जाते . गंगायत्री पाटील सध्या मेकॅनिकल विभागामध्ये अंतिम वर्षाला शिक्षण घेत आहे, तिच्या निवडीचे पत्र इन्फोसिस कंपनी कडून तिला नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती इन्फोसिस आयटी कंपनीने दिली आहे, अशी झाली निवड तोंडी परीक्षा ५ विभागात होते, लॉजिकल ,मॅथेमॅटिक अँबिलिटी, व्हर्बल , पझल सोल्यूशन , पसेडी कोड आणि पंधरा दिवसानंतर मुलाखतीत ह्यूमन रीसर्च अँड टेक्निकल ग्राउंड असे एकत्र घेण्यात आले, मुलाखतीचे माध्यम इंग्रजी व वेळ २०मिनिटाचे होती .
या इंटरंशिपच्या दरम्यान विविध चाचण्या परीक्षांमधून तिने दाखविलेली गुणवत्ता प्रमाणभूत धरून कंपनीने तिला ऑफर दिली, या कंपनीत निवड झाल्यास खूपच आनंद होत आहे ,भविष्यामध्ये आपल्या देशाच्या आयटी आणि संगणक शास्त्र (computer science) क्षेत्रामध्ये नवनिर्मितीचे योगदान देण्याचे माझे स्वप्न आहे, असे तिने सांगितले .
eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम