२१ वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप उदयपुर राजस्थान येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातून नागार्जुनराव अकुला व देविदास झिटे यांचे घवघवीत यश

बातमी शेअर करा

इ मुंबई चौफेर | ७ एप्रिल २०२२ | २१ वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप उदयपुर राजस्थान येथे आयोजित केली होती या स्पर्धेसाठी २३ राज्यातुनएकूण ५०० पेक्षा जास्त स्पर्धक सहभागी झाले होते, या स्पर्धेत महाराष्ट्रातील औरंगाबाद येथून प्रतिनिधित्व करण्यासाठी महापारेषण औरंगाबाद मंडळातील श्री. नागार्जुनराव अकुला (व्यवस्थापक वित्त व लेखा मंडळ औरंगाबाद) व औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात अव्वल कारकून पदी कार्यरत असणारे श्री देविदास झिटे या दोन स्पर्धकांची निवड झाली होती, सदरील ५०० स्पर्धक हे अशा विविध १४ श्रेणीमध्ये विभागले होते सदरील श्रेणी ही शारीरिक अपंगत्वाच्या टक्केवारी वर होती. र१ चा अर्थ शारीरिकदृष्ट्या सर्वात अक्षम तर र १०चा अर्थ शारीरिक दृष्ट्या सर्वात कमी अक्षम असा होता.

तसेच र११ १४ या श्रेणीमध्ये अंध आणि डाऊन सिंड्रोम अशा स्पर्धकांचा समावेश होता. श्री. नागार्जुनराव अकुला यांनी ८७ टक्के शारीरिक अपंगत्वानुसार र6 या श्रेणीनुसार तर श्री देविदास झिटे यांनी ६१ टक्के शारीरिक अपंगत्वानुसार र8 या श्रेणीनुसार या पुढील स्पर्धेमध्ये आपला सहभाग घेतला.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम