गो. से. महाविद्यालय खामगाव येथे कॉलेज कट्टा कार्यशाळा संपन्न

बातमी शेअर करा

मुंबई चौफेर | ७ एप्रिल २०२२ | महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व गो.से. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कॉलेज कट्टा जिल्हा स्तरीय कार्यशाळांचे आयोजित करण्यात आले होते यां माध्यमातून यूपीएससी एमपीएससी करिता करियर गायडन्स म्हणून, महाविद्यालयात करियर कट्टा मंच स्थापन करण्यात आला. . या कार्यशाळेत बुलढाणा जिल्ह्यामधील जवळपास सर्वच महाविद्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या मध्ये प्राचार्य, IQAC चे समन्वयक, करियर कट्टा चे तालुका व जिल्हा समन्वयक यांची कार्यशाळेला उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रफुल्ल उबाळे उपस्थित होते. समाजातील लोकांची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील युवकांनी हे करियर निवडणे गरजेचे आहे ,शिकत असताना याबाबत दिशादर्शक मार्गदर्शन मिळाले तर, सोईचे होते. महाविद्यालयात शिकत असताना स्पर्धा परीक्षेचा विचार करण्याची याबाबत जाण निर्माण केली पाहिजे. याबाबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षापूर्व मानसिकता तयार करणे महत्त्वाचे आहे. .

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम