गुड शेपर्ड स्कुल चा SSC चा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल

गुड शेपर्ड स्कुल चा SSC चा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल

बातमी शेअर करा

गुड शेपर्ड स्कुल चा SSC चा सलग चौथ्या वर्षी १०० टक्के निकाल

सानिया सुधर्मा पाटील ९३.८० टक्के गुणांसह प्रथम

धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल यांनी आपल्या उज्वल यशाची परंपरा जपत सलग चौथ्या वर्षी देखील इयत्ता १० वी च्या १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोनाच्या कठीण कालावधीत १० वी च्या शैक्षणिक वर्षात वाटचाल करण्याऱ्या विद्यार्थ्यांसमोर परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाईन असा प्रश्न होता. शेवटी सर्व बाबींचा सारासार विचार करून परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. अनेक प्रकारे द्विधा मनस्थितीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तम कामगिरी बजावत १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. विविध स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्या यशात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा त्यांचा पालकांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. यामध्ये सानिया पाटील – ९३.८०% (प्रथम), भाग्यश्री पाटील – ९३.२०% (द्वितीय), निलय केदार – ९३.००% (तृतीय) या विद्यार्थ्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित, माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख, वर्गशिक्षिका भारती तिवारी यांच्यासह अनुराधा भावे, सपना पाटील, दामिनी पगरिया, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड आदी उपस्थित होते. विद्यार्थांनी संपादन केलेल्या उत्तम यशाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले व स्कुल मॅनेजमेंट च्या वतीने त्यांच्या पुढील उज्वल भवितव्यासाठी सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.

बातमी शेअर करा

eMumbaiChoufer अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम